चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात वणव्यात होरपळून तारा तुकाराम वाघे (वय 70) या वृद्धेचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तारा वाघे या 27 मार्चपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या शोधासाठी नातेवाईकांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, गाणे-खडपोली परिसरात लागलेल्या वणव्यानंतर जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती हा मृतदेह तारा वाघे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. वणव्याच्या तीव्रतेमुळे त्या होरपळून मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. मृतदेह शवविच्छेनासाठी शिरगाव प्रा. आ. केंद्रात पाठविण्यात आला आहे.