Earthquake 
रत्नागिरी

Ratnagiri Earthquake | रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी, रात्री ८ वाजून १९ मिनिटाला जाणवला धक्का

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, यामुळे जिल्हाभरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली आहे.या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर आणि रेखांश ७३.४४ पूर्व असा रत्नागिरी भागातच जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.

भूकंपाची तीव्रता कमी असली तरी काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने ते घराबाहेर आले होते. सुदैवाने, या भूकंपाच्या धक्क्यामुळे जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT