Ratnagiri Drug-Free Campaign (Pudhari Photo0
रत्नागिरी

Ratnagri News | रत्नागिरी जिल्हा ड्रग्जमुक्त करणार

Public Interaction | पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जनसंवादमध्ये व्यक्त केला निर्धार

पुढारी वृत्तसेवा

येथे Ratnagiri News या विषयासाठी योग्य meta keywords आणि meta slug इंग्रजीत दिले आहेत:

✅ Meta Keywords (in English):

, , , , , , anti-drug drive, Ratnagiri news, Maharashtra police initiatives,

✅ Meta Slug (in English):

ratnagiri-drug-free-campaign-nitin-bagate --- हवे असल्यास यावर आधारित **meta description**, इंग्रजी न्यूज हेडलाइन किंवा संक्षिप्त लेखही तयार करून देऊ शकतो.

चिपळूण : जनसंवाद बैठकीत उपस्थित पोलिस अधीक्षक नितीन बगाटे. सोबत बैठकीला उपस्थित असलेले चिपळूणचे नागरिक.

Ratnagiri Drug-Free Campaign

चिपळूण : जिल्हा ड्रग्ज मुक्त करायचा आहे. जो कोणी ड्रग्ज विकत असेल त्याची गाठ पोलिसांशी आहे. त्यांचे कंबरडे मोडणार, प्रसंगी आपण स्वतः छापा टाकू, महिलांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन 7 दिवसात चार्ट शीट दाखल करणार, असा निर्धार पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चिपळूणमध्ये आयोजित सामाजिक सलोखा जनसंवाद बैठकीत व्यक्त केला.

ही सभा कापसाळ येथील माटे सभागृहात शुक्रवारी सायंकाळी झाली. यावेळी नागरिकांनी काही समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे बगाटे यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर माजी आमदार सदानंद चव्हाण, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बगाटे म्हणाले की, सामाजिक सलोखा सभेला तुमची सर्वांची उपस्थिती पाहून तुम्हाला सॅल्यूट आहे, इतरत्र सेवा बजावीत असतांना सोबत लाठी असायची. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात आल्यावर लाठी बाजूलाच ठेवली आहे. इतका हा जिल्हा शांत आहे. इथल्या समाजाला जबाबदारीचं भान आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. एकमेकांशी संवाद कायम रहावा, बैठका व्हाव्यात, यासाठीच सामाजिक सलोखा सभा असून यातून सलोखा वाढणार आहे. तुम्ही कधीही बोलवा, आपण येऊ तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

महिलांच्या सुरक्षितततेच्या द़ृष्टीने पोलिस नेहमीच आग्रही राहतील. व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या बाजूने फिरतील यासाठी लक्ष द्यावे. जेणेकरून तपासाच्या दृष्टीने पोलिसांना मदत होईल. धूम स्टाईल वाहनधारकांवर कारवाई करण्याबरोबरच मोठे सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणार्‍या वाहनधारकांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. जनतेने पोलिसांना सहकार्य करावे असे, शेवटी आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, जयद्रथ खताते, उद्योजक केतन पवार, सुरेश सावर्डेकर, समीर काझी, मुराद अडरेकर, बाळकृष्ण जाधव, मिलिंद कापडी तसेच बहुसंख्येने महिला, पुरूष उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT