रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात तापमान वाढत चालल्यामुळे अंत्योदय व प्राधान्य गटातील हजारो,लाखो लाभार्थ्यांना तीन महिन्याचे धान्य एकदाच वितरण करण्याचा निर्णय झाला. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे रेशन देण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.
दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून महिन्यातील धान्याचे वाटप होत आहे. त्यामुळे उन्हातान्हात रेशनसाठी लाभार्थ्यांची वणवण थांबणार आहे. अंत्योदय कुटूंबातील लाभार्थ्यांना तांदूळ २१४२.७०, गहू १६०५.६० तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तांदूळ ८६९०.७५, गहू ५७७५.७५ इतके धान्य वाटप होणार आहे. यातील दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरुवात झाली आहे.