रत्नागिरीः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक व आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३ हजार ६३० विद्यार्थी पात्र झाले आहेत. कोल्हापूर विभागात रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
जिल्ह्यातील पूर्व उच्चप्राथमिक (इ.५ वी) निकाल २८.५१ टक्के तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वीचा) निकाल २१.४० टक्के इतका लागला आहे. ३६.१५ टक्के विद्यार्थी पात्रतेसह प्रथम क्रमांकावर राहिले आहेत, तर राजापूर तालुका ३१.८६ टक्के पात्रतेसह दुसऱ्या स्थानकावर राहिला आहे. खेड तालुका ३१.४१ टक्के, सर्वात कमी निकाल मंडणगडात ९.७३ टक्के पात्रतेसह सर्वात शेवटी तालुका राहिला आहे.