रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील रिक्त आस्थापना व नव्याने मागणी असलेल्या रास्त धान्य दुकानांसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना 72 गावांत परवानगी देण्यात आली असून 18 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर छाननी व जागा पाहणीनंतर 31 मार्चपर्यंत जिल्हा पुरवठा विभागाकडे अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक दापोली, गुहागर तालुक्यातील प्रत्येकी 13 गावांत रेशन दुकानांना मंजुरी मिळाली आहे. तर सर्वात कमी लांजा तालुक्यात केवळ एका गावात मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत वाढीव लोकसंख्यामुळे व मागणीमुळे 72 ठिकाणी नवे रेशन दुकान होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 862 रास्त धान्य दुकाने सुरू आहेत. यापैकी रिक्त जागा व नव्याने काही रेशन दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात जाहीरनामा काढण्यात आलेली दुकानांपैकी मंडणगड तालुक्यात वलौले, आंबवणे बु, काटे, बोरखत, वेसवी, नारायणनगर अशा सहा ठिकाणी जाहीरनामा काढला आहे. दापोलीमधील मौजे दापोली, इळणे, सारंग, दापोली 1, दापोली 3, गव्हे, हातिप, पिसई, कोंगळे, रूखी, सातांबा, आजर्ला 2, उर्फी, खेडमध्ये सार्पिली, नांदिवली दंडवाडी, कर्जी, सवणस खुर्द, निळीक, हुंबरी, घाणेखुंट, तळघर, शिर्शी, कोंडिवली, कुळवंडी. गुहागर तालुक्यात मुसलोंडी, असगोली, झोंबडी, मुंढर, पाभरे, मासू, रानवी, देवघर, आवरे, असोर, कातळवाडी, बारभाई, पांगरी तर्फे हवले, चिपळूणमधून वाघिवरे 1, वाघिवरे 2, केतकी, कालुस्ते बु, पर्शुराम, धामणवणे, नायशी, दुर्गवाडी खुर्द, पिलवली तर्फे, सावर्डे, रिक्तोली. संगमेश्वर तालुक्यात वायंगणे, कुंभारखाणी बु, देवरूख नं. 3, कोंड्ये, रत्नागिरी तालुक्यात जयगड, रत्नागिरी नं.18, वरवडे भंडारवाडा, रत्नागिरी नं.19, नाखरे, लांजा तालुक्यात खोरनिनको, राजापूर तालुक्यातील पांगरी खुर्द, पडवे, आंबोळगड, वाल्ये, वडदहसोळ, सागवे नं 3, देवाचे गोठणे, सौंदळ, मोगरे भराडे अशा 72 गावांत दुकानासाठी जाहीरनामा काढला आहे.