दहीहंडी  
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्ह्यात २,५७८ दहीहंड्या फुटणार

गोविंदा पथकांमध्ये चुरस; यंदा १७२ दहीहंड्यांची घट

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : जिल्ह्यात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दहीकाला उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात यावर्षी सार्वजनिक २८५ आणि खासगी २,२९३ दहीहंड्या उभारणात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये १८७ घट झाली आहे. मात्र, खासगी दहीहंड्यांमध्ये १५ दहीहंड्यांची वाढ झाली आहे.

राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रुपये किमतीची बक्षिसे जाहीर केली आहेत. त्‍यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळवण्यासाठी मंडळांमधील चुरस व थरार अनुभवण्यास मिळणार आहे. दहीहंडी उत्‍सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे गोविंदा पथकांकडून जोरदार सराव सुरू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT