रत्नागिरी : जिल्हा बँकेच्या सभेत उपस्थित आमदार किरण सामंत यांचा सत्कार करताना अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे. 
रत्नागिरी

Ratnagiri | जिल्हा बँक निवडणुकीमुळे संचालक मंडळाच्या बदनामीचा डाव

बँकेच्या कारभारात गलथानपणा असता तर नाबार्ड किंवा आरबीआयने सोडले असते का? : अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत एकाही सभासदाने बँकेच्या कामकाजविषयी तक्रार केली नाही. मात्र, दुटप्प्या वृत्तीने तक्रार केली. शेतामध्ये राहणाऱ्या लोकांना बँकेचा तोटासुद्धा कळत नाही, मात्र त्याला घोटाळा दिला. आज उज्ज्वल कामगिरीच्या जोरावर जिल्हा बँक दोन नंबरवर आहे. बँकेच्या कारभारात गलथानपणा असता तर नाबार्ड किंवा आरबीआयने सोडले असते का, असा प्रश्न जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी उपस्थित केला. निवडणूक जवळ येऊ लागल्यामुळे संचालक मंडळाला बदनाम करण्याचा मार्ग अवलंबण्यात येत असून सभासदांनी योग्य व्यक्तीलाच भविष्यात बँकेवर पाठवावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहरातील आरोग्य मंदिर कार्यालयात आयोजित ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शक करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. डॉ. चोरगे म्हणाले की, २० वर्षांपूर्वी बँकेची कमान हातात घेताना प्रचंड लढाई झाली, त्याचे दुःख आहे. बँकेची स्थिती त्यावेळी वाईट होती, ही सुधारायची कशी, अशी भीती मनात होती. थकबाकी १३ मात्र ६३ टक्क्यांपर्यंत एनपीए त्यावेळी होता. त्यानंतर वेगवेगळे निर्णय घेत बँकेने कठोर निर्णय व त्यात संचालक, सर्व सभासद, कर्मचारी यांची निष्ठाश्रेणी मोलाची ठरली. त्यामुळे आज बँक ऊर्जितावस्थेत येऊन राज्यात दोन नंबरवर पोहचली आहे. संचालक मंडळात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. सहकारामध्ये राजकारण आणले की, संस्था बुडीत निघते म्हणून समाज, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या दोन वर्षांच्या कामकाजामुळे दोन वर्षांत बँकेच्या एकाही सभासदाने तक्रार केली नाही. मात्र आता भलत्याच व्यक्तीने तक्रार केली आहे. शेतामधील एका व्यक्तीला बँकेत घोटाळा दिसत असल्याचा टोलाही त्यांनी नाव न घेता मारला. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करून लोकांना बँकेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्याबाहेर साखर कारखान्यांना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप केला जातोय, बेकायदेशीर व्यवहार केले असो तर नाबार्ड-आरबीआय कारवाई करायचे ठेवेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी आरोप वेळेत एवढे नाही तर १,२४४ कोटी साखर कारखान्यांना कर्ज दिले असल्याचे डॉ. चोरगे यांनी थेट सांगितले. जिल्हा बँकेने एकट्यानेच नाही तर तीन-चार बँका एकत्र येऊन हा कर्ज पुरवठा करतात, त्यातही राज्य बँक किंवा अन्य अग्रणी बँक यास लीड घेत असते. आपल्या पेक्षाही सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई बँकांनी साखर कारखान्यांना अधिक कर्ज दिल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले. साखर कारखान्यांकडून १२१ कोटी ३० लाखांचे व्याज मिळाले आहे. मुळात जिल्ह्यात एवढा कर्ज वितरण होत नसल्याने ठेवीदारांना व्याज देता यावे यासाठी सहकार कायद्याच्या अधीन राहून आरबीआयच्या नियमानुसार हे कर्ज व्यवहार करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या २० वर्षांत आपण गैर काहीही केले नाही. संचालकांनी कर्ज घेतले व बुडवले असे एकही प्रकरण आमच्या कालावधीत घडले नाही. बँकेत काही चुकीच्या गोष्टी घडल्या, त्याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाईही बँकेने वेळोवेळी केल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले.

चांगल्या गोष्टी घालवण्यासाठी वाईटपणा घ्यावा लागतो, असे सांगतानाच आता बँकेच्या सभासदांनीच बँकेचे मूल्यांकन करावे, असे आवाहन करताना त्यांचा विश्वास हाच आमचा ताकद असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या माणसांना या बँकेत निवडून आणा, कोण उभा आहे, कसा आहे याचा विचार करा, सहकार आणि संस्था महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन बँकेला आणखी उंच शिखरावर न्या, असे आवाहनही डॉ. चोरगे यांनी शेवटी व्यक्त केले.

यावेळी अनेक सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करीत पुढील तीन वर्षांनंतर पुन्हा बँकेवर यावे व बँकेच्या वाटचालीसाठी सर्वांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.

आमदार किरण सामंत यांचा बँकेकडून सत्कार

आमदार होण्यापूर्वी जिल्हा बँक संचालक राहिलेले किरण सामंत यांनी त्यानंतर संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. बँकेने राज्यात केलेल्या प्रगतीबद्दल संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेतर्फे, संचालकांना भेटण्यासाठी आ. किरण सामंत यांनी उपस्थित राहून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आ. किरण सामंत यांचा सत्कार केला.

आ. भास्कर जाधवांकडून संचालक मंडळाचे अभिनंदन

आमदार भास्कर जाधव यांनी बँकेला पत्र देऊन वर्षभरातील कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला असून, बँकेने केलेली प्रगती लक्षणीय असून याबाबत संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

संचालक मंडळाची ही शेवटची सर्वसाधारण सभा होती. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, ज्येष्ठ संचालक सुधीर कांबळे, अनंत गानगावकरा, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक अॅड. दीपक पटवर्धन, ज्येष्ठ संचालक रमेश दळवी, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे, महेश चीर, अमजद बोरकर, जगन्नाथ गवडे, नेहा माने, दिशा दाभोळकर याच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिरपणकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालक समीर दळवी यांनी निवेदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT