देवरुख : अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना देवरुख पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री पकडून गुरे, वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो व दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. निवधे कळकदरा रस्त्याने आंबाघाटा कडे जाणारी एक बोलेरो पीकअप जीप गुरांची अवैध वाहतूक करत असल्याची टीप देवरुख पोलिसांना मिळाली. देवरुख पोलिसांनी तातडीने कारवाई करून जीप सह दोघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम पंदेऱे, सचिन कामेरकर, सचिन पवार, अभीजीत वेलवणकर, गणेश सुतार यांनी पार पाडली गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांनी सध्या मुख्य रस्ते सोडून आतील मार्गाचा वापर केल्याचा संशय पोलिसांना होता. त्या पार्श्वभूमीवर पाळत ठेवून कारवाई करण्यात आली. वाहतूक करणाऱ्या दोघांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.