Crop Damage File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्‍ह्यातील ५ हजार हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण!

१८ हजार ३६९ शेतकरी बाधित, पंचनाम्‍याला आला वेग; ९ तालुक्‍यात पंचनामे सुरू, भात उत्‍पादन घटणार

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : खरीप हंगामात कमी पावसामुळे निर्माण झालेल्‍या दुष्काळी परिस्‍थितीच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्‍याला वेग आला असून आजअखेर जिल्‍ह्यातील १८ हजार ३६९ शेतकऱ्यांच्‍या ५ हजार हेक्‍टरवरील भात, नाचणी पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्‍याचे सांगण्यात आले.

कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यात यंदा पाऊस अपेक्षापेक्षा कमी झाला. अल निनोच्‍या प्रभावामुळे जिल्‍ह्यात पाऊस कमी होवून भात पिके धोक्‍यात आली आहे. यंदा ३५ टक्‍के उत्‍पादन घटणार असल्‍याचे सांगण्यात आले. दरम्‍यान, पहिल्‍या ट्रीगरमध्ये जिल्‍ह्यातील राजापूर, संगमेश्वर आणि रत्‍नागिरी तालुक्‍याचा समावेश करण्यात आला असून दुष्काळ जाहीर करण्यात आला. उर्वरित सहा तालुक्‍यात ही दुष्काळाची परिस्‍थितीत असल्‍यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांच्‍या सूचनेनुसार जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने ९ तालुक्‍यात पंचनामे सुरू आहेत.

महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, कर्मचारी प्रत्‍यक्षात शेतकऱ्यांच्‍या बांधावर जावून पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत ५ हजार ६० हेक्‍टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाली आहे. ऑक्‍टोबर अखेर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे प्रस्‍ताव पाठवण्यात येणार आहे. त्‍यानंतर शासनाच्‍या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्‍याचे सांगण्यात आले.

६ तालुक्‍यांचा दुष्काळ यादीत समावेश नाही!

रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील तीन तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र उर्वरित सहा तालुक्‍यात ही परिस्‍थिती तशीच असून शासनाकडे जिल्‍हा प्रशासन, कृषी विभागाच्‍या वतीने शासनाला दोन वेळा प्रस्‍ताव पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप जिल्‍ह्यात सहा तालुक्‍यांचा समावेश दुष्काळ यादीत समावेश केला नसल्‍याचा सांगण्यात आले.उर्वरित तालुके दुष्काळात कधी समाविष्ट होणार याकडे शेतकऱ्यांच्‍या नजरा लागून राहिल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT