Crime News pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : गोवळकोट रोडवर सात जणांकडून तरुणाला मारहाण; वाहनाचीही तोडफोड

पूर्व वादातून हल्ला; चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : गोवळकोट रोड परिसरात पूर्वीच्या वादातून एका तरुणाला लाकडी बांबू व लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ जून रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास गोवळकोट रोड येथील अथीना प्लाझा परिसरात घडली.

याप्रकरणी फैजान फिकदर चौगुले (वय २५, रा. खेडी मोहल्ला, चिपळूण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अब्दुल शेख, शाकीर शेख, बाबू शेख, खालिद शेख, अथलम शेख, फारुख बाबाथेब शेख व अमान शेख (सर्व रा. गोवळकोट रोड, चिपळूण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नीबाबत असलेल्या पूर्वीच्या वादाच्या कारणावरून संशयितांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर लाकडी बांबू व लोखंडी पाईपने डोके, दोन्ही हात, पाय तसेच शरीराच्या इतर भागांवर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT