Arrest Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Crime : काजू फॅक्टरी फोडणारे दोघे जेरबंद

९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी येथील झिमण्स कॅश्यु पॉईंट काजू फॅक्टरीत चोरी करणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा एकूण ९ लाख ४१ हजार ८७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही चोरी २८ मे रोजी सायंकाळी ६ ते २९ मे रोजी सकाळी ९.२० या कालावधीत घडली होती. फॅक्टरी फोडून काजूगर चोरीला गेल्याची तक्रार लांजा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी शाहरुख मुराद साखरकर (३०, रा. भाट्ये नवानगर, रत्नागिरी) आणि वजीद मोहम्मद अझीझ खान (४१, मूळ रा. बांद्रा पश्चिम, मुंबई; सध्या रा. भाट्ये, रत्नागिरी) यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान दोघांनीही चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ९ लाख ४१ हजार ८७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लांजा पोलिस करत आहेत.

पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहाय्यक पोलिस फौजदार सुभाष भागणे, पोलिस हवालदार विजय आंबेकर, अमित कदम, दिपराज पाटील तसेच चालक पोलिस शिपाई अतुल कांबळे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT