रत्नागिरी

Ratnagiri Crime : खेडशीत उधारी मागितल्याने दुकान मालकाच्या डोक्यात घातला चिरा

ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : किराणा सामानाच्या पैशांची तसेच उधारीची विचारणा केल्याच्या रागातून दुकानमालकाच्या डोक्यात चिरा घालून खून करण्याचा प्रयत्‍न केला. या प्रकरणी संशयिताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १६) दुपारी ३.३० वाजण्‍याच्‍या सुमारास खेडशी येथील सरस्वती सुपर मार्केट किराणा दुकानात घडली.

रमेश चंद्रकांत खेत्री (३८, रा. खेडशी-कारवांचीवाडी, रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात दुकानमालक भीमसिंह भवरसिंह पुरोहित (४२, रा. खेडशी नाका कारवांचीवाडी, रत्‍नागिरी) यांनी तक्रार दिली.

फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी रमेश खेत्री याने किराणा सामान खरेदी केल्यावर भीमसिंह यांनी त्‍याच्याकडे सामानाचे पैसे तसेच मागील उधारीची मागणी केली. या गोष्टीचा राग आल्याने संशयित रमेश खेत्रीने शिवीगाळ करत लोखंडी सळई भीमसिंह यांच्या खांद्यावर मारली. तसेच दुकानाबाहेर पडलेला चिरा उचलून भीमसिंह यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT