गुहागरात मारुती इको कारची दुचाकीला धडक; प्रौढाचा मृत्यू  
रत्नागिरी

Ratnagiri Accident : गुहागरात मारुती इको कारची दुचाकीला धडक; प्रौढाचा मृत्यू

गुहागर दिवाणी न्यायालयासमोरील घटना

पुढारी वृत्तसेवा

गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर कार व दुचाकी अपघातामध्ये ४७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ६.४५ वाजता हा अपघात घडला. संजय वसंत कानसरे (वय ४७, राहणार गुहागर, वरचापाट सांगळेवाडी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

प्रसिद्ध पेंटर म्हणून त्यांचे नाव होते. काल सायंकाळी ६.४५ वाजता मोडकाघर येथून ते दुचाकीने गुहागरकडे येत होते. याचवेळी गुहागरकडून शृंगारतळीकडेे जाणाऱ्या मारुती इको कारला या दुचाकीची धडक बसली. या अपघातामध्ये संजय कानसरे हे जबर जखमी झाले होते. त्यांना कामथे येथील रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. कामथे रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर सोमवारी गुहागर चैतन्यभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT