उसने पैसे मागितले म्हणून कोयत्याने वार file photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : उसने पैसे मागितले म्हणून कोयत्याने वार

मुरडे-शिंदेवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

खेड ः उसने दिलेल्या पैशांची मागणी केल्याच्या रागातून खेड तालुक्यातील मुरडे-शिंदेवाडी येथे एकावर कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वा.सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश बाबाराम खामकर, बाबाराम खामकर (दोन्ही रा. मुरडे शिंदेवाडी, खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सचिन परशुराम तटकरी (32, रा.भडगाव खोंडे मधलीवाडी, खेड) यांनी तक्रार खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी सचिन तटकरी यांनी संशयित निलेश खामकरला 2 हजार रुपये उसने दिले होते. त्या पैशांची मागणी करण्यासाठी ते पत्नीसह शुक्रवारी रात्री संशयितांच्या घरी गेले होते. फिर्यादी सचिन तटकरी यांनी निलेशकडे आपल्या 2 हजार रुपयांची मागणी केली असता निलेशने पैसे परत करण्यास नकार दिला. व फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर संशयित बाबाराम खामकर घरातील कोयता घेऊन त्याठिकाणी आला आणि त्याने फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने वार केला. फिर्यादीच्या डोक्याला दुखापत होउन रक्त येउ लागल्यावर फिर्यादीची पत्नी प्रिती ही फिर्यादीला धरण्यासाठी आली असता बाबाराम खामकरने तिलाही शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी मारहाण केली. याप्रकरणी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी खेड पोलिस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दिली असून अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT