गुजराती व्‍यक्‍तीने चिपळुणात नदीत उडी घेऊन संपविले जीवन  
रत्नागिरी

Ratnagiri Crime : गुजराती व्‍यक्‍तीने चिपळुणात नदीत उडी घेऊन संपविले जीवन

फरशी तिठा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील फरशी तिठा येथे वाशिष्ठी पुलावरून उडी मारून गुजराती व्‍यक्‍तीने जीवन संपविल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. अमित शहा (४०, मूळ रा. गुजरात, सध्‍या रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्‍याचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी वाशिष्ठी नदीपात्रात फरशी तिठ्यानजिक एक मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक लोकांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी ही माहिती चिपळूण पोलिसांना दिली. यानंतर चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या सहकार्याने तरंगणारा मृतदेह वाशिष्ठी नदीतून बाहेर काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी ओळख पटवून हा मृतदेह विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

मृत अमित शहा हा २१ जून रोजी कोकण रेल्वेने चिपळूण येथे आल्याची माहिती मिळाली आहे. गेले वर्षभर तो मुंबईमध्ये वास्तव्यास होता. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्याने चिपळूण तालुक्यातील एका युवतीशी प्रेमविवाह केला होता. त्या दृष्टीने चिपळूणचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे अधिक तपास करीत आहेत. याबाबत अन्य काही कारणे आहेत का याचाही शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT