चिपळूण शहर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार कदम असे त्याचे नाव आहे.
याबाबतच्या माहितीनुसार, मंदार कदम याने अल्पवयीन मुलीला एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून, धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडिता गर्भवती झाली. पीडित मुलीने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर मंदारवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.