पोलिस असल्याचे भासवून दोन लाखांची चेन लांबविली 
रत्नागिरी

Ratnagiri Crime : पोलिस असल्याचे भासवून दोन लाखांची चेन लांबविली

चिपळूण शहरातील घटना; 80 वर्षीय वृद्ध लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरात पोलिस असल्याचे भासवून दोन अज्ञात संशयितांनी एका 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना रविवारी (दि. 15) सकाळी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद शांताराम दौलतराव साळवी (वय 80, रा. गगनगिरी सोसायटी, रॉयलनगर चिपळूण, मूळ राहणार कुळयेवाशी, संगमेश्वर) यांनी दिली आहे.

साळवी हे रविवारी सकाळी 11.38 वाजण्याच्या सुमारास चिपळूण एसटी डेपोच्या बाजूला स्वागत हॉटेलसमोर जाणाऱ्या रस्त्यावर आले होते. त्यावेळी मागून मोटासायकल वरून आलेल्या दोन अज्ञातांनी आपण पोलिस असल्याचे सांगून साळवी यांना अडविले. अंगावरील सोन्याची चेन, हातातील घड्याळ व घराची चावी काढण्यास सांगितले. तसेच खिशातील रुमाल काढून देण्यास सांगितले. साळवी यांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सोन्याची सुमारे दोन तोळे वजनाची चेन, घड्याळ व चावी रुमालात ठेवून दिली. त्या संशयितांनी रुमालात सर्व वस्तू ठेवून तो परत दिल्याचे भासवून मोटारसायकलवरून तेथून पलायन केले.संशय आल्याने साळवी यांनी तत्काळ रुमाल तपासून पाहिला असता त्यात घड्याळ व घराची चावी होती; मात्र सोन्याची चेन नव्हती. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेत सुमारे दोन लाख रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची गळ्यातील चेन लंपास झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT