जगबुडी पुलावरून कंटेनर नदीपात्रात कोसळला 
रत्नागिरी

​Ratnagiri News : जगबुडी पुलावरून कंटेनर नदीपात्रात कोसळला

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पुलावरून बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर थेट नदीपात्रात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर पुलावरून नदीपात्रात कोसळला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा शोध घेतला जात आहे. कंटेनरमध्ये चालकासह आणखी इतर कोणी प्रवासी होते का, याचीही प्रशासनाकडून पडताळणी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिस, महसूल विभाग, आपत्कालीन यंत्रणा आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. नदीपात्रात कोसळलेल्या कंटेनरचा तसेच चालकाचा शोध युद्धपातळीवर सुरू असून आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बचावकार्य राबविण्यात येत आहे.

बचावकार्य वेगात

दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने प्रशासनाने सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. या दुर्घटनेचा काही प्रमाणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर आणि अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण तसेच जीवितहानीबाबत स्पष्ट माहिती समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT