चिपळुणात दुचाकीच्या धडकेत महिला ठार Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri : चिपळुणात दुचाकीच्या धडकेत महिला ठार

पेठमाप एन्रॉन पुलाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील पेठमाप एन्रॉन पुलाजवळ पादचारी महिलेला शाईन मोटारसायकलने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या यास्मीन मैनुद्दिन शेख (वय 38, रा. उक्ताड बायपास, चिपळूण) यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी मोटारसायकल चालक अश्रफ हुसेन मणियार (रा. शिरळ मोरेवाडी, ता. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात दि. 30 सप्टेंबर रोजी रात्री 8.20 वाजण्याच्या दरम्यान एन्रॉन पूल येथे घडला. याबाबतची फिर्याद तौसिफ मुकादम यांनी चिपळूण पोलिसांत दिली आहे. त्यानुसार यास्मीन शेख या मेजवान कॅफे पेठमाप येथून कामावरून पायी चालत घरी जात असताना एन्रॉन ब्रिज येथे पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या शाईन मोटारसायकलची त्यांना धडक बसली. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT