Ratnagiri Accident News 
रत्नागिरी

Ratnagiri Accident : मोरवंडेत कार दरीत कोसळून पाच जखमी; तिघे गंभीर

जखमींवर खेड येथील रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील मोरवंडे येथील सुरभि हॉटेलसमोर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात अल्टो कार सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळल्याने ५ जण जखमी झाले आहेत. यातील तिघेजण गंभीर जखमी आहेत.

रविवारी (दि. ७ जून) रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून मुंबई-ठाणेच्या दिशेने जाणारी अल्टो कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गालगतच्या दरीत कोसळली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक नऊ घोलप तसेच सामाजिक कार्यकर्ते वेदांत, राहुल, मनमोहन, अमर मोरे, वर्ग भोसले आणि सुरेश हंबीर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर भरणे नाका पुलाखालील नाणीजधाम जगद्‌गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थानची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

अपघातात सिद्धी नाईक (वय २९), रिद्धी नाईक (२९), स्नेहल नाईक (५८), सिद्धेश नाईक (६५) आणि तेजस बोरकर (३१, सर्व रा. मुंबई-ठाणे) हे जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका सेवेमुळे जखमींना त्वरित उपचार मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT