ST Bus News | File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : मुलीचा एसटी पास असूनही वाहकाने तिकीट काढले!

वडिलांनी देवरूख एसटी कंट्रोलरची कॉलर पकडली!

पुढारी वृत्तसेवा

देवरूख : मुलीचा एसटी पास असूनही वाहकाने तिकीट काढल्‍याने संतप्‍त झालेल्‍या वडिलांनी देवरूख बसस्थानकातील वाहतूक निरीक्षकाची कॉलर पकडून जाब विचारल्‍याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी निवे बुद्रूक येथील व्‍यक्‍तीवर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत वाहतूक निरीक्षक तुषार कोळी (वय ३४, रा. देवरूख खालची आळी) यांनी फिर्याद दिली. मिलिंद मुकुंद यादव (रा. निवे बुद्रूक, ता. संगमेश्वर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मिलिंद यादव यांची मुलगी बुधवारी एसटी बसने प्रवास करत होती. तिच्याकडे निवे बुद्रूक ते देवरूख असा एसटी पास होता. मात्र, ती बावनदी येथे चढल्याने वाहक रजनी जाधव यांनी यादव यांच्या मुलीकडून पैसे घेऊन तिकीट काढले.

यामुळे संतप्‍त झालेले मिलिंद यादव हे पत्नी व मुलींसह देवरूख बसस्थानकात आले आणि तुषार कोळी यांच्या अंगावर धावून जात कॉलर पकडली. तसेच यादव यांनी एसटीवाल्यांची लायकी नाही, असे बोलून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याचे कोळी यांनी फिर्यादीत नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT