कोंडगाव बाजारपेठेत घरफोडी 
रत्नागिरी

रत्नागिरी : कोंडगाव बाजारपेठेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाजारपेठेतील स्मिता जितेंद्र शेडे (42) यांच्या घरी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घरात झालेल्या चोरीत दागिने व रोख रक्कम अशा सुमारे 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला.

स्मिता शेडे या कालावधीत घराच्या मागे गेल्या होत्या, मोठा मुलगा भूषण हा जेवण आटोपून बाहेर गेला, तर छोटा मुलगा प्रशांत (13) हा झोपला होता. यावेळी स्मिता शेडे या घरात आल्या असता त्यांना दोन कपाटे उघडलेली आढळली. याचदम्यान कपाटातील रोख 45 हजार रुपये व साडेतीन तोळ्याचे दागिने अशी एकूण 1 लाख 85 हजार रु.च्या मुद्देमालाची चोरी झाली असल्याचे लक्षात आले. घरी चोरी झाल्याचे शेडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी साखरपा पोलिसांना माहिती दिली. पंचनामा करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासासाठी श्वानपथकाला पाचारण केले, पण तेही तेथेच घुटमळले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT