रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील प्राचीन श्री आमनायेश्वर मंदिरात (Amanayeshwar temple) महाशिवरात्री निमित्त भाविकांनी आज (दि.२६) पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळच्या कालावधीत भाविकांची संख्या तुलनेने कमी असली तरी दुपार नंतर मंदिरात दर्शनासाठी रांग लागली होती. (Mahashivratri 2025)
हजारो वर्षे जुने असलेल्या या मंदिरात दिवसभरात हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. मंदिर परिसरात मोठी जत्रा भरते. लहान मुलांसाठी जत्रा हा मोठा कुतूहलाचा विषय असतो. महाशिवरात्री निमित्त श्री देव आमनायेश्वराचे पालखीतून थाटामाटात आगमन होते. त्रिपुर लावला जातो. मंदिर परिसरातील हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.