भोस्ते घाटात ईर्टिगा कारचा अपघात; चार जखमी 
रत्नागिरी

Ratnagiri Accident : भोस्ते घाटात ईर्टिगा कारचा अपघात; चार जखमी

कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात 3 मे रोजी सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास ईर्टिगा कारचा अपघात होऊन चार जण जखमी झाले. मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात असलेल्या (एमच-०३-बीजे-२२९०) कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या सुरक्षा भिंतीवर आदळले.

अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणिज धाम यांची २४ तास कार्यरत विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच खेड वाहतूक पोलिस कर्मचारी संपत गीते यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातात निकिता अनंत साळवी (३०), अश्विनी अनंत साळवी (५८), अनंत शंकर साळवी (६१) आणि अद्विक कृष्णा नवाले (५, सर्व रा. मालाड, मुंबई) हे जखमी झाले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताच्या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT