रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने सहा महिने मुक्काम केल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीला ही उशिर झाला. जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड होत असते. मात्र यंदा रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 71.43 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक बांबू लागवड ही राजापुरात झाली आहे. रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर, लांजा या चार तालुक्यांत बांबू लागवड झालेली नाही. जिल्हा परिषदेची आकडेवारीवगळता कृषी विभागातील ही आकडेवारी आहे. कृषी, जिल्हा परिषदेची आकडेवारी मिळून जिल्ह्यात बांबू लागवड वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, यंदाच्या वेळेस उद्दिष्टापेक्षा कमी लागवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात महिन्यात बांबू लागवड सुरू झालेली असून यंदाच्या 2025-26 या वर्षासाठी 450 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे. मात्र कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीत जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 71.43 टक्के बांबू लागवड झालेली आहे. जिल्हा परिषदेची आकडेवारी समाविष्ट केल्यास आणखी बांबू लागवडीचे आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. पडीक जमीन, शेताचे बांध, माळरानावर दलदलीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी म्हणून विविध विभागांनी मेहनत घेतली. महात्मा गांधी रोजगार ही योजनांतर्गत 450 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून सक्षम व शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने बांबू लागवड सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 71.43 टक्के इतकी बांबू लागवड झालेली आहे. सर्वाधिक बांबू लागवड ही राजापुर तालुक्यात झाली आहे.शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी