लांजा : रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत विहिरीत पडून एका ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
गणेश लक्ष्मण दाभोळकर (वय ५८ वर्षे, रा. आसगे मांडवकरवाडी) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. मृत पावलेल्या गणेश दाभोळकर हे घरापासून काहीच आंतरव वाडीमध्ये असलेल्या विहिरती पडल्याचे आढळून आले. नागरिकांनी विहिरीकडे धाव घेत त्यांना बाहेर काढले. मात्र गमेश हे कोणताच प्रसिताद देत नसल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णलाय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गणेश दाभोळकर याना मृत घोषीत केले.
या घटनेची खबर त्यांचा मुलगा योगेश गणेश दाभोळकर (३२, रा. आसगे मांडवकरवाडी) यांनी लांजा पोलिसांना दिली. लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी नोंद लांजा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.