रत्नागिरी : एप्रिल महिन्यासाठी जिल्ह्यातील 38 हजार 535 अंत्योदय कार्डधारक सदस्यांकरिता अंत्योदय तांदूळ 702.50 मे. टन व गहू 529 मे. टन नियतनाची भारतीय अन्न महामंडळ पनवेल यांच्याकडून प्राधान्यची उचल करण्यात आली आहे. एप्रिलसाठी तालुकानिहाय धान्य साठ्याचे वितरण केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी बुधवारी दिली.
एप्रिलसाठी अंत्योदय कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वितरण प्रतिकार्ड 35 किलो प्रमाणात करायचे असून त्यासाठी धान्यसाठ्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अंत्योदय तांदूळ 20 किलो व गहू 15 किलो असे असेल.
मंडणगड तालुक्यात 1550 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 27.50 मे.टन तांदूळ, तर 22 मे.टन गहू , दापोली तालुक्यात 3194 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 53.50 मे. टन तांदूळ, तर 40 मे.टन गहू, खेड तालुक्यात 3867 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 74 मे. टन तांदूळ, तर 56 मे. टन गहू, गुहागर तालुक्यात 3272 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 64.50 मे. टन तांदूळ, तर 48 मे.टन गहू, चिपळूण तालुक्यात 5835 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 107 मे.टन तांदूळ, तर 81 मे.टन गहू, संगमेश्वर तालुक्यात 7091 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 139 मे. टन तांदूळ, तर 106.25 मे. टन गहू, रत्नागिरी तालुक्यात 4385 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 85 मे. टन तांदूळ, तर 63.25 मे. टन गहू, लांजा तालुक्यात 3462 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 69 मे. टन तांदूळ, तर 51 मे. टन गहू, राजापूर तालुक्यात 4234 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 83 मे. टन तांदूळ, तर 61.50 मे.टन गहू चे वितरण करण्यात आले आहे.