लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटातील तीव्र उतारावर ट्रक पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. श्याम सिंग (५८, रा. सुकरताल, उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.
श्याम सिंग हे ट्रक (एचआर-३८ एक्स ०९९३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लायडिंगचे साहित्य घेऊन जात होते. अंजणारी घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो महामार्गावर उलटला. या अपघातात श्याम सिंग गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल जाधव अधिक तपास करीत आहेत.