रत्नागिरी : रस्ता ओलांडताना भरधाव कारची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 1 मे रोजी रात्री सुमारे 7.30 वाजता कारवांचीवाडी फाटा येथे घडली. प्रभाकर शांताराम साळवी (66, रा. रॉयल अपार्टमेंट, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
या प्रकरणी कार चालक अभिजित प्रभाकर मोहिते (रा. एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपेश सुधाकर सुर्वे (35, रा. सुयश कॉम्प्लेक्स, मुकादम हॉस्पिटलजवळ, खेडशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रभाकर साळवी हे रत्नागिरी–हातखंबा मार्गावरील कारवांचीवाडी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना संशयित चालकाने भरधाव वेगाने कार (एमएच-08-बीई-3379) चालत त्यांना धडक दिली.