मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लवेल येथे पादचारी मुलींना धडक दिल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उलटलेली मोटार.(छाया: अनुज जोशी) 
रत्नागिरी

Ratnagiri Accident : लवेल पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात; दोन तरुणींना कारची धडक

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील लवेल पेट्रोल पंपासमोर अपघात, एकूण चौघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील लवेल पेट्रोल पंपासमोर रविवारी दि.३० रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा पंच मोटारीने रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोन अल्पवयीन तरुणींना जोरदार धडक दिली. त्यानंतर मोटार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात दोन तरुणींसह मोटारीतील महिला व पुरुष असे एकूण चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटार(एमएच १२ टीवाय ४३८१) गोव्याच्या दिशेने जात असताना लवेल पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. मोटारीची दोन तरुणींना जोरदार धडक बसल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघातामुळे मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातात यास्मिन निजाम पटाईत (वय १४, रा. लवेल) आणि मानसी केशबंद केदारनाथ शर्मा (वय १४, रा. लवेल) या दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासह मोटारीतील एक महिला आणि पुरुषही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दोन्ही अल्पवयीन तरुणींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत तपशील तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT