photo viral case
रत्नागिरीत तरूणीचे अश्लिल फोटो व्हायरल file photo
रत्नागिरी

रत्नागिरी : तरूणीचे अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्या तरूणाला अटक

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : इन्स्टाग्राम अकाउंटवरून तरूणीशी चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करून तिचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी शुक्रवारी (दि.१३) अटक केली. दशरथ सिद्धराम गायकवाड उर्फ वनराज अश्विन देशमुख (वय ३२, रा. संतोष नगर, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी त्याला मुंबईतून ताब्यात घेतले.

याप्रकरणी पीडित तरूणीने ७ जूनला ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत संशयिताविरुद्धात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार झाला होता. त्याचा फोन बंद असल्यामुळे त्याचा नक्की ठाव-ठिकाणा सापडत नव्हता. दरम्यान संशयित देवनार चेंबूर मुंबई येथे असल्याची गोपनीय ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याचा मोबाईल जप्त केला. त्याने पीडित तरूणीप्रमाणेच इतर मुलींशी देखील इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप अकाउंटवर चॅटिंग तसेच व्हिडीओ कॉल करून त्यांचेही अश्लील फोटो व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव मोरे, भैरवनाथ सवाईराम, मंदार मोहिते आणि उमेश मोहिते यांनी केली.

SCROLL FOR NEXT