रत्नागिरी जिल्ह्यात सापाचा ३८० जणांना दंश  pudhari file photo
रत्नागिरी

Ratnagiri News | जिल्ह्यातील ४,१४१ जणांना प्राणी पडले 'भारी'

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट पाच महिन्याच्या कालावधीत ३८० जणांना सर्पदंश झाला. या सर्वांचे प्राण वाचले. त्याचबरोबर १ हजार ४०९ जणांना कुत्र्याने तर २ हजार ३५२ जणांना इतर प्राण्यांनी चावा घेतला होता. या सर्वांचे प्राण वाचवण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांवर प्रामुख्याने एएसव्ही इंजेक्शनद्वारे उपचार करण्यात आल्याने सर्पदंश झालेल्यांचे प्राण वाचू शकले. दरम्यान, अशा रुग्णांच्या दृष्टीने रुग्णालयात या औषधीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागात असून, त्यामध्ये बहुतांश लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारे आहेत, शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. अशा वेळी साप चावल्याच्या अनेक पटना घडतात. मात्र, प्रत्येक साप विषारी असतो असे नाही. महाराष्ट्रात सापांच्या ५२ प्रजाती आहेत, त्यामध्ये केवळ १२ प्रजाती विषारी आहेत, तर ४० जाती बिनविषारी आहेत. तसेच नागरी वस्तीकडे आपले भक्ष्य शोधण्यासाठी येणाऱ्या सापांच्या जाती या चार असून, त्यामध्ये घोणस, फुरसे, नाग अत्तणि मण्यार यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणताही साप चावल्याने मृत्यू होतो असे गृहीत धरणे चुकीचे असल्याचे सर्पविषयक तज्ज्ञ आणि सर्पमित्रांकडून सांगितले जाते.

जिल्ह्यात मागील पाच महिन्याच्या कालावधीत ३८० जणांना सर्पदंश झाला होता, सर्पदंश झालेल्या ३८० जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आले. सापांबरोबर इतरती प्राण्यांनी चावा घेतल्याची संख्या जिल्ह्यात जास्त आहे. यामध्ये विषारी विंचू तसेच इंगली, माकड, मांजर यांचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यांत २ हजार ३५२ जणांना इतर प्राण्यांनी चावा घेतला आहे. त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. गेल्या पाच महिन्यात १ हजार ४०९ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.

साप चावल्यास अशी घ्यावी काळजी

घराच्या परिसरात साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवले पाहिजे, सर्पदंश इाल्यावर त्वरित रुग्णालयात जावे. तंत्र, मंत्र किंवा मांत्रिकाडून विष उतमण्याचे प्रकार करू नये. साप चावल्यास भावत जाऊन रुग्णालय गाठू नये, यामुळे विष जोमाने चढते. प्रत्येक साप विषारी नसतो. त्यामुळे सापांना मारणे टाळावे. शेतातील साप शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT