शिक्षक pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : अतिरिक्त शिक्षकांचा तिढा आज सुटणार

काही हरकतींचे निराकरण, उर्वरित 13 हरकतींवर आज सुनावणी; अंतिम यादी होणार प्रसिद्ध

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पटसंख्याअभावी रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी अनुदानित, अंशता अनुदानित माध्यमिक शाळांमधील 263 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्या शिक्षकांचे समायोजन होणार असून त्यासाठी हरकतीसाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागास एकूण 29 हरकती प्राप्त झाल्या होत्या. काही हरकतींचे निराकरण करण्यात आले. त्यापैकी 13 हरकतींवर 13 एप्रील रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील 263 अतिरिक्त शिक्षक, 150 अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात तात्पुरती यादी तयार करून हरकतींसाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा भरातून हरकती आल्या. त्यातील काही हरकती सोडवण्यात आल्या तर चुकीच्या पध्दतीने अतिरिक्त ठरवले यासह विविध कारणांसाठी हरकती घेण्यात आल्या आहेत. त्या 13 हरकतींसाठी सोमवारी सुनावणी होणार आहे.

... तर 99 शाळा शून्य शिक्षक होणार

रत्नगिरी जिल्ह्यातील 263 शिक्षकांचे समायोजन लवकरच होणार आहे. समायोजन झाल्यानंतर जिल्ह्यातील 99 शाळा शून्य शिक्षक होणार आहे. त्यामुळे शून्य शिक्षक झालेल्या शाळा परिसरातील विद्यार्थ्यांना रोजच्या रोज दुरवर पायपीट करून दुसऱ्या शाळेत शिक्ष्ाणासाठी जावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT