परतीसाठी आज 221 एसटी बसेस धावणार  
रत्नागिरी

Ratnagiri : परतीसाठी आज 221 एसटी बसेस धावणार

रत्नागिरीतून परतीच्या प्रवासास सुरुवात; राज्य परिवहनचा रत्नागिरी विभाग सज्ज

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपल्या गावी परतले असून मोठ्या उत्सवात गणपती उत्सव सुरू आहे. गणेशोत्सवानंतर गणेश भक्तांचा परतीचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने एसटी आरक्षणाचे आवाहन करण्यात आले होते. आतापर्यंत 21 हजार 139 एसटी बसेसचे बुकिंग झाले असून त्यामध्ये 1,355 बसेस आरक्षण, 784 बसेसचे ग्रुप बुकिंग झाले आहे. परतीच्या प्रवासास सुरुवात झाली असून सोमवारी रत्न्ाागिरी आगारातून 5 एसटी बसेस मुंबईला रवाना झाल्या आहेत. तर 2 सप्टेंबर रोजी 190 आरक्षण, 31 ग्रुप बुकिंग बसेस अशा एकुण 221 एसटी बसेस मुंबईला जातील. रत्नागिरी विभागातून 2 ते 7 सप्टेंबरपर्यंत 21 हजार 139 एसटी बसेस मुंबईला रवाना होणार आहेत.

गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्या वतीने 5 हजार 200 बसेस कोकणात सोडण्यात आल्या. त्यापैकी 2950 एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या. मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचे प्रतिष्ठापना गणेशभक्तांनी केली. आता मंगळवारी विसर्जन होणार आहे. त्यानंतर गणेशभक्तांना मुंबईला जाण्याचे वेध लागते. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून 2 हजार 500 एसटी बसेसचे नियोजन केल आहे. आतापर्यंत 21 हजार 139 एसटी बसेसचे बुकींग झाले आहे.उर्वरित एसटी बसेसचे ग्रुप बुकींग लवकरच होण्याची शक्यता आहे. आणखीन जादा एसटी बसेसची मागणी असल्यास गाड्या वाढवण्याच्या विचारात रत्नागिरी विभाग आहे. 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत रत्नागिरी विभागातून टप्प्या टप्प्याने एसटी बसेस मुंबईला रवाना होतील. दरम्यान, रत्नागिरी आगारातून सोमवारी पाच बसेस मुंबईला रवाना झाल्या आहेत. मंगळवारी 11 असे 7 सप्टेंबरपर्यंत 188 एसटी बसेस रत्नागिरी आगारातून परतीच्या प्रवासासाठी रवाना होतील.

गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत 21 हजार 139 एसटीचे बुकिंग झाले असून अद्याप दोन दिवसांचा अवधी असून ज्यांनी एसटीचे तिकीट काढले नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग करावे. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून मंगळवारी 221 एसटी बसेस मुंबईला जाणार आहेत.
प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT