राजापूर-रत्नागिरी मार्गावर पूर्णगड येथे कार-ट्रक अपघात
प्राथमिक शाळेसमोरील चढावात समोरासमोर धडक
ट्रक चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
३० डिसेंबर रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास घटना
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
राजापूर ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर पूर्णगड प्राथमिक शाळेच्या समोरील चढावात कारला ट्रकची धडक बसून अपघात झाला. अपघाताची ही घटना ३० डिसेंबर रोजी रात्री ९.४५ वा. सुमारास घडली.
बालाप्पा रमेश कुश्ती (वय २५, रा. हरिजन केरी हुकेरी बेळगाव, कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात अशोक राजेंद्र बनप (३५, रा. मुरुगवाडा नवानगरवाडी, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ३० डिसेंबर रोजी फिर्यादी राजेंद्र बनप आपल्या ताब्यातील इरटिका कार (एमएच ०८-बीई-९४४४) घेउन राजापूर ते रत्नागिरी असा जात होता. तो पूर्णगड प्राथमिक शाळेच्या समोरील चढावात आला असता समोरुन येणारा ट्रक (के.ए-२२-डी-८९८५) ची फिर्यादीच्या कारला समोरुन उजव्या बाजूस ठोकर बसून हा अपघात झाला.