पुढारी ऑनलाईन डेस्क : योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे, असे सुचक विधान करत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज (दि.३) पक्षबदलाचे संकेत दिले आहेत. साळवी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ते (Rajan Salvi) पुढे म्हणाले की, माझ्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत. मी आता त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. माझ्या पराभवाला कारणीभूत कोण? हे शोधणे गरजेचे आहे. मागील काही दिवस माझ्या पक्ष प्रवेशाबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत. मी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चां सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा आग्रह होता की, मी त्यांच्याशी संवाद साधावा. त्या अनुषंगाने राजापूर आणि लांजा मधील पदाधिकार्यांशी मी संवाद साधला.
यावेळी राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या वर पक्षाकडून अन्याय झाला आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. आता योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे दाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.