रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियाच्या जमान्यात बातम्या कितीही वेगाने पसरत असल्या तरी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी वृत्तपत्राचाच आधार घेतला जातो. आजही वृत्तपत्रावरच वाचकांचा विश्वास असल्याचे मत 'पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी व्यक्त केले.
वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीतील वाचकांनी, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी यांनी कार्यालयात येऊन भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या. दै. 'पुढारी'ची ८७ व्या वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करून गुरुवारी, १ जानेवारीला ८८व्या वर्षात पदार्पण केले. मराठी पत्रकारितेतील विश्वासार्हतेचे, निर्भिडतेचे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या दैनिक 'पुढारी'ला गुरुवारी मोठ्या संख्येने शुभेच्छा दिल्या.
१९३८ साली स्थापन झालेल्या दैनिक 'पुढारी'ने मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न, सामान्य माणसाचा आवाज, सामाजिक प्रश्न, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला तसेच दुर्लक्षित घटकांचे मुद्दे सातत्याने मांडत 'पुढारी'ने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. निर्भीड मांडणी, स्पष्ट भूमिका आणि लोकहिताला प्राधान्य देणारी पत्रकारिता हे 'पुढारी'चे वैशिष्ट्य राहिले आहे.
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळातही दैनिक पुढारी'ने काळाची पावले ओळखत डिजिटल माध्यमांतही भक्कम उपस्थिती निर्माण केली आहे. प्रिंटसोबतच डिजिटल, ई-पेपर आणि सोशल मीडिया माध्यमांतूनही वाचकांशी नाते अधिक दृढ केले आहे. त्यामुळे नव्या पिढीतील वाचकांपर्यंतही 'पुढारी' पोहोचत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दैनिक 'पुढारी'ने स्थानिक प्रश्नांना सातत्याने बाचा फोडली आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, मासेमारी, उद्योग, पर्यटन तसेच प्रशासनाशी संबंधित विषयांवर 'पुढारी'ने नेहमीच प्रभावी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोकणवासीयांच्या मनात 'पुढारी'बद्दल आपुलकी आणि विश्वास निर्माण झाला आहे.
सायंकाळी स्नेहमेळाव्याला उपस्थित राहत जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार बाळ माने, रत्नागिरीच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, नगरसेविका प्रीती सुर्वे, वैभवी खेडेकर, नगरसेवक विजय खेडेकर, रत्नागिरी न.प. मधील भाजपचे प्रभाग क. १ मधील नगरसेवक सचिन जाधव, चेतन बारगोडे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षक राजश्री पाटील व सहकारी अधिकारी,
जिल्हा कारागृह अधीक्षक सचिन पाटील व सहकारी, कोकण रेल्वे रत्नागिरी येथील जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा माध्यम अधिकारी ए.जी. बेंडखुळे, शिक्षक संघटनेचे संतोष रावणांक, जि.प. कक्ष अधिकारी, मनोरुग्णालय अधीक्षक डॉ संघमित्रा फुले, क्षयरोग व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, लोकमत रत्नागिरीचे आवृत्तीप्रमुख मनोज मुळ्ये, उपसंपादक अरुण आडिवरेकर, पत्रकार शोभना कांबळे, तन्मय दात्ये, चिनार नार्वेकर, अमोल खापरे, रत्नागिरी एक्स्प्रेसचे आनंद तापेकर, जमील खलपे, हॉटेल डायमंडचे दिनेश शानभाग व सहकारी,
नवनीत काणेकर, समीर साळवी, तेज कुरीवरचे कर्मचारी, रत्नागिरीतील मुख्य पेपर एजंट आरीफ काझी, सुनील जगताप, समीर माने, योगा शिक्षिका निधी देवळेकर व अमन देवळेकर, पी. एस. लिमये कंपनीचे कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी अमरनाथ चितळे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, एबीपी माझाचे पत्रकार अमोल मोरे, पत्रकार राकेश गुढेकर, तरुण भारतचे विजय पाडावे, प्रवीण जाधव, 'प्रहार'चे पत्रकार प्रशांत हरचेकर, मत्स्य विभागाचे सचिन साटम, हे उपस्थित होते. पुढारी रत्नागिरीच्या आवृत्ती प्रमुख जान्हवी पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन !
दै. 'पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालयामध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळच्या पूजेचे यजमान पद दीपक शिंगण व सौ. दीक्षा शिंगण यांना मिळाले. यावेळी पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.