गर्भवतींची पसंती सरकारी इस्पितळालाच 
रत्नागिरी

रत्नागिरी : गर्भवतींची पसंती सरकारी इस्पितळालाच

2020 ते 2025 अशा पाच वर्षात 13 हजार 936 झाल्या प्रसूती

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गरिब, मध्यमवर्गीय आपला इलाज आता सिव्हील हॉस्पिटलमध्ये करून लागले आहेत. खासगी रुगणालयामध्ये प्रसूती करण्यासाठी लाखोरूपये खर्च येत असल्यामुळे गरोदर माताही आता सिव्हील हॉस्पीटलला पसंती देत आहेत. मागील वर्षात 13 हजार 936 इतक्या प्रसूती झाल्या असून त्यापैकी 8 हजार 950 इतक्या या नैसर्गिक डिलिव्हरी झाली 4 हजार 986 इतक्या सिझेरियन प्रसूती झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

महिला गर्भवती झाल्यानंतर प्रसतीसाठी खासगी किंवा सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल होत असतात. मात्र खासगी हॉस्पीटलमध्ये प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेत असतात. त्यामुळे गरिबांना ते परवडत नाही. सर्वसामान्य, कष्टकरी व मध्यवर्गीय लोक विविध ऑपरेशनसाठी, गरोदर माता आता सिव्हील हॉस्पीटलमध्ये वळू लागल्या आहेत. एकीकडे इतर जिल्ह्यात खासगीसह सिव्हील हॉस्पीटलमध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढत असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र परिस्थिती वेगळी असल्याची दिसून आली. येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे गरोदर मातांची नैसर्गिक प्रसूती वाढली आहे तर सिझेरियनचे प्रमाण कमीच असल्याचे मागील पाच वर्षाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

सिव्हील हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढले असून. गरोदर महिला, बाळाची परिस्थिती पाहूनच प्रसूती नॉर्मल करायची की सिझेरियन करायची याचा निर्णय घेतला जातो. यंदाच्या वर्षी 2 हजार 632 एकुण डिलिव्हरी झाल्या आहेत. तर मागील पाच वर्षात 13 हजार 936 इतक्या प्रसूती झाल्या आहेत.
डॉ. सांगवीकर, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल कॉलेज व स्त्रीरोग तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT