खेड : शिवसेनेत जाहीर प्रवेश करणाऱ्या ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते याचे स्वागत करताना ग्रहराजमंत्री ना. योगेश कदम सोबत शिवसेना नेते रामदास कदम. (छाया : अनुज जोशी) 
रत्नागिरी

Ratnagiri News : खेड तालुक्यात राजकीय भूकंप! जामगे येथे ठाकरे सेनच्या तालुका प्रमुखासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

स्थानिक राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथे गुरुवारी (दि. २ एप्रिल) झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली. गृहराज्यमंत्री योगेश कदम व ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे, हा प्रवेश केवळ औपचारिक नसून संघटनात्मक ताकद वाढवणारा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांच्या नेतृत्वाखाली गणेश भिलारे, संजय भिलारे, विशाल भिलारे, स्वप्नील भिलारे, साखरोली येथील आत्माराम भुवड, मधुकर भुवड, सरपंच सौ. अमृता धाडवे, सुरज धाडवे, अजिंक्य कदम, बारकू शिंदे, रामचंद्र पाटील, बाळाराम धाडवे, सुभाष म्हादे, तुकाराम भावे, श्रेयस पाटील, अभिजित कदम, पंकज शिगवण, शेवंती धाडवे, जयवंती भावे, मीनाक्षी भावे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी एकमुखाने शिंदे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, किशोर देसाई, जिल्हा परिषद सभापती अरुण कदम, उद्योजक शैलेश कदम, नगराध्यक्ष माधवी बुटाला यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकांपूर्वी हा शिंदे गटासाठी मोठा बूस्टर मानला जात आहे. स्थानिक राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT