चिपळूणमध्ये भरधाव कारची धडक बसून पादचारी ठार  (Pudhari File Photo)
रत्नागिरी

Ratnagiri Accident : चिपळूणमध्ये भरधाव कारची धडक बसून पादचारी ठार

चालकाचे पलायन; घटनास्थळी संतप्त नागरिकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण: शहरातील कावीळतळी येथे पादचार्‍याला कारने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये रमेश कळकुट्टी (50) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळी न थांबता तेथून पळ काढला. या घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाली. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी चालकाने पळ काढल्याने चिपळुणात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रमेश कळकुट्टी हे रस्त्याच्या कडेने बहादूरशेकडे चालत निघाले होते. याचवेळी अभिजित जयंद्रथ खताते हा इनोव्हा क्रिस्टा गाडीने खेर्डीच्या दिशेकडे निघाला होता. त्याच्या कारची पादचारी रमेश कळकुट्टी यांना धडक बसली आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाल्याने जागीच गतप्राण झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. या घटनेनंतर चालक अभिजीत खताते याने घटनास्थळावरून पलायन केले. यामुळे नागरिकांनी तिव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर खेर्डी परिसरातील ग्रामस्थ व मृताच्या नातेवाईकांनी शहरातील पोलिस स्थानकात धाव घेतली. पोलिस स्थानकात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होती. अपघातप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यास कोणी इच्छूक नव्हते. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या हस्तक्षेपानंतर रात्री उशिरा या प्रकरणी चालक अभिजीत खताते याच्यावर गुन्हा करण्यात आला. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT