खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू file photo
रत्नागिरी

रत्नागिरी : नेवरे येथील खाडीच्या पाण्यात बुडून एकाचा आकस्मिक मृत्यू

Creek accident: उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः तालुक्यातील नेवरे खाडी बुडून एका प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास उघडकीस आली. दिलीप सहदेव फणसे (42, रा. चिंचवणे नेवरे, रत्नागिरी) असे खाडीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी नेवरे येथील खाडीच्या पाण्यात तेथील ग्रामस्थांना दिलीप फणसे हा बुडून मृतावस्थेत दिसला. याबाबत त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT