महिलेची एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक Pudhari Photo
रत्नागिरी

रत्नागिरी : महिलेची एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः पुढारी वृत्तसेवा

टेलिग्राम अ‍ॅपवर वेगळवेगळे टास्क पूर्ण केल्यावर जास्तीचा परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखवत महिलेची 1 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना 18 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 ते 19 जुलै रोजी सायंकाळी 6.47 वा. कालावधीत फणसोप सडा येथे घडली आहे.

पियूष यादव, मीनाक्षी गानोस्कर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी तिच्या मोबाईलमधील इन्स्टाग्राम अ‍ॅपवर लिंक पाठवून तिच्याशी ओळख निर्माण केली. त्या महिलेची एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक वेगेवेगळे टास्क पूर्ण केल्यावर जास्तीचा परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखवले.

त्या आमिषाला बळी पडत फिर्यादी महिलेने संशयितांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण 1 लाख 3 हजार रुपये भरले. परंतु, त्यातील फक्त 3 हजार रुपये परत करुन संशयितांनी फिर्यादीची 1 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),सह माहिती तंत्रज्ञान 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT