नवानगरमध्ये क्रिकेटच्या वादावरून एकावर चाकूहल्ला File Photo
रत्नागिरी

नवानगरमध्ये क्रिकेटच्या वादावरून एकावर चाकूहल्ला

Navanagar crime : गुहागर पोलिसांनी केली अटक

पुढारी वृत्तसेवा

गुहागर शहर : गुहागर तालुक्यामधील नवानगर येथे क्रिकेट खेळताना क्षुल्लक कारणावरून एकावरती चाकू हल्ला झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर बारा तासांमध्ये आरोपीला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे.

दि. 24 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 17.00 वा. चे सुमारास फिर्यादी ऋषिकेश रामदास नाटेकर त्यांचे मित्रासोबत स्वप्नील पटेकर यांच्या नवानगर ता. गुहागर येथील घराच्या मागील बाजुस असणा-या क्रकेट ग्राउंडवर क्रिकेट खेळत असताना सत्यजीत बबन पटेकर रा. नवानगर ता. गुहागर जि. रत्नागिरी याने क्षुल्लक कारणावरून फिर्यादी यांचे अंगावर धावून येऊन शिवीगाळी करून थांब तुला दाखवतो, अशी धमकी दिली व त्याच रागातून सायंकाळी 19.30 वा. च्या सुमारास फिर्यादी व त्याचे मित्र अभय पालशेतकर, अवधून कोळथरकर यांच्यासोबत नवानगर भट्टी जवळील पुलावर ता. गुहागर येथे बसलेले असताना फिर्यादी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने सत्यजीत पटेकर याने फिर्यादी यांचे पाठीत चाकू खुपसून पोटातही चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला.

खूप शहाणा झाला आहे का? तुला खुप क्रिकेट कळते का? आज तुझा जीवच घेतो म्हणजे तु जास्त बोलणार नाहीस, असे बोलुन फिर्यादी यांचा हात झटकून फिर्यादी ढकलून दिले. अभय पालशेतकर अवधूत कोळथर यांनी त्याला धरले असता त्याने आम्हा सर्वांना तुम्हाला माहित नाही का मी खून प्रकरणातून सुटून आलो आहे. आणखीन मर्डर करायला मला फरक पडणार नाही, असे बोलून फिर्यादी व त्यांचे मित्राना ठार मारण्याकरिता अंगावर धावून आला व तेथे पडलेला फिर्यादी यांचा मोबाइल घेवून निघून गेलेला आहे.

या प्रकरणात फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सत्यजीत बबन पटेकर रा. नवानगर विट्ठलवाडी ता. गुहागर जि. रत्नगिरी यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करुन आरोपी सत्यजित पटेकर याला बारा तासाच्या आत गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुजित सोनवणे करत आहेत. सत्यजित पटेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT