रत्नागिरी : लोहारकाम करणार्‍या कुटुंबाची झोपडी या घटनेत जळून खाक झाली. 
रत्नागिरी

Ratnagiri : मुंबई-गोवा महामार्ग 17 तासानंतर पूर्ववत

निवळी येथील अपघातात मालमत्तांचे 25 लाखांचे नुकसान ; एलपी गॅस वाहतुकीविरोधात असंतोष

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपी गॅस वाहतून करणार्‍या टँकरने मिनी बसला धडक दिल्यानंतर तो उलटून गॅस गळती झाल्याने लागलेल्या आगीत परिसरातील तीन घरे, एक चार घरे आणि साहित्याचे मिळून 25 लाखाहून अधिकचे नुकसान झाले. या घटनेनंतर तब्बल 17 तासाने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या प्रकरणी टँकर चालकावर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निवळी घाटात रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जोईल यांच्या घरासमोरील उतारात गॅस वाहतूक करणार्‍या टँकरने मिनीबसला धडक दिली. यात बस उलटल्याने 26जण जखमी झाले. टँकरही उलटल्याने त्यातून गॅस मोठ्याप्रमाणात बाहेर पडला. त्यामुळे परिसरातील दोन घरे आणि एका झोपडीला आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने पोलीस यंत्रणेने महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. छोट्या गाड्या अन्य मार्गावरुन वळवल्या होत्या. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह ग्रामीण पोलीस स्थानक, महामार्ग पोलीस अधिकारी संपूर्ण दिवस व रात्र महामार्गावर तळ ठोकून उभे होते. अग्निशमन यंत्रणाही सकाळपर्यंत महामार्गावर तैनात करण्यात आली होती. या टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये शिफ्ट केल्यानंतर व परिसर सुरक्षित झाल्यानंतर जवळपास 17 तास नंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.? ? या भागात रात्रभर पोलीस, ग्रामस्थ कार्यरत होते. याप्रकरणी पोलीस पाटील संजना पवार यांच्या तक्रारीवरुन टँकर चालक राजेश महावीर यादव याच्यावर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमध्ये संतोष शामराम बेंडखळे यांच्या घर, साहित्य व गाड्यांचे मिळून साडेसोळा लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बेंडखळे यांची मोटार सायकल व कार पूर्णत: जळून गेली. सुधीर शामराम बेंडखळे यांचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. यांची म्हैस व वासरु जखमी झाले आहेत. रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली आहे. घराचे व आतील साहित्याचे नुकसान झाले आहे. रविंद्र शेट्ये यांच्या घर व साहित्याचे मिळून सुमारे एक लाख 42 हजाराचे नुकसान झाले आहेत. तर लहू दिनकर साळुंखे व रेश्मा लहू साळुंखे यांचेही सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. याचबरोबर लोहारकामाचे साहित्य व त्यांची रोख रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेमध्ये सर्वांचे सुमारे 25 लाखाहून अधिकच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर तहसीलदार राजाराम म्हात्रे रविवारी दिवसभर घटनास्थळी होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तलाठी व मंडल अधिकार्‍यांनी नुकसानीचे पंचनामे केले. या घटनेमध्ये चिपळूणमधील 26 शिक्षक जखमी झाले होते. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील काहींना उपचार करुन घरी सोडण्यात आले.

पोलिस अधीक्षकांच्या असौजन्यशील वर्तनाविरोधात महानिरीक्षकांकडे तक्रार

निवळी अपघातानंतर स्थानिक मंडळींनी जखमींना रुग्णालयात पाठवण्याची महत्वाची भूमिका बजावली व अन्य शासकीय यंत्रणांना याची माहिती दिली. महामार्ग पोलीस घटनेनंतर तासभराने व ग्रामीण पोलीस त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर जवळपास दोन तासांनी घटनास्थळी आलेल्या पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मदत करणार्‍या स्थानिकांना असौजन्यशील वागणूक ळदिल्याचा आरोप भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चा रत्नागिरी दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी केला असून, या बाबतची त्यांनी लेखी तक्रार पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT