मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रसायन वाहतूक टँकर उलटला; चालक जखमी 
रत्नागिरी

Ratnagiri Accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रसायन वाहतूक टँकर उलटला; चालक जखमी

महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे येथील जगबुडी पुलाजवळ आज रसायन वाहतूक करणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड औद्योगिक वसाहतीतून रसायन घेऊन निघालेला टँकर भरणे जगबुडी पुलाजवळ आला असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर उलटला. अपघातानंतर टँकरमधील रसायन नदीपात्रात सांडू लागल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली असून स्थानिक नागरिकांमध्ये रसायन सांडल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT