मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत वेरळ येथे दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानंतर रस्त्याच्या बाजूला गेलेली मोटार Pudhari
रत्नागिरी

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर दुचाकी - कारचा भीषण अपघात; चार जण जखमी

खेड तालुक्यातील वेरळ येथे अपघात

पुढारी वृत्तसेवा

Bike Car Collision Khed

खेड : तालुक्यातील वेरळ येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि. १) सकाळी सुमारे सव्वा अकराच्या दरम्यान दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत.

भांडुप (मुंबई) येथून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या कारचा चालकाचा ताबा सुटल्याने पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन भिंतीवर आदळली.

या अपघातात कारमधील शीला राजाराम दळवी (७४), सदानंद गणपत दळवी (६५) आणि गिरीश राजाराम दळवी (४५, सर्व रा. भांडुप, मुंबई) तसेच दुचाकीस्वार दीपक अनंत गोवळकर (३१, रा. वेरळ, ता. खेड) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका परिसरात तैनात असलेल्या रुग्णवाहिकेने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परतेने मदतकार्य पार पाडले. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT