एसटीचे एनसीएमसी कार्ड आता मिळणार घरपोच 
रत्नागिरी

Ratnagiri News|एसटीचे एनसीएमसी कार्ड आता मिळणार घरपोच

ऑनलाईन प्राधान्य रांग स्लॉट बुकिंग प्रणाली सुरू; एसटी कार्यालय किंवा अधिकृत केंद्रात आता रांगेत उभारावे लागणार नाही!

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : परिवहन महामंडळाकडून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी आता ऑनलाईन प्राधान्य रांग स्लॉट बुकिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे एसटी कार्यालय किंवा अधिकृत केंद्रात तासनतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. अगदी घरपोच हे स्‍मार्ट कार्ड आता उलब्‍ध होणार आहे.

हे स्लॉट बुकिंग पूर्णपणे मोफत आहे. एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी आगाऊ वेळ निवडता येईल. इतकेच नाही तर, केंद्रावर जाणे टाळायचे असल्यास प्रवाशांना कार्ड थेट घरपोच मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. महामंडळाच्या या उपक्रमामुळे एनसीएमसी कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर झाली आहे.

जिल्‍ह्यात पाच लाख जणांनी काढले स्‍मार्ट कार्ड

रत्‍नागिरी शहरासह जिल्‍ह्यातून तब्‍बल पाच लाख सवलतधारकांनी स्‍मार्ट कार्ड काढले आहे. स्‍मार्ट कार्ड काढण्यासाठी अद्यापही बसस्‍थानक, खासगी एजंटकडे मोठी गर्दी होत आहे. नोव्‍हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून त्‍यानंतर एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. तोपर्यंत पावतीवर सवलत देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT