मंडणगड : तालुक्याच्या प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी दिलेले निवेदन स्वीकारले. त्याप्रसंगी खासदार सुनील तटकरे. Pudhari File Photo
रत्नागिरी

मंडणगड तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणार : खा. सुनील तटकरे

कोलाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलते होते

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नांवर राज्य व केंद्र शासनाच्या स्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी कोलाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

खासदार सुनील तटकरे यांनी पंचायत समिती मंडणगड येथे एक महिन्यापूर्वी घेतलेल्या जनता दरबारात उपस्थित समस्यांवर प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी ते बोलते होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध समस्यांवर संबंधित यंत्रणेच्या सचिव स्तरावरील अधिकार्‍यांशी फोनद्वारे बोलून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना खासदार तटकरे यांनी दिल्या. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या आंबडवे - लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम गतीने व्हावे, याकरिता केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी व राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी थेट संपर्क साधून नियोजित वेळेत रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

किल्ले मंडणगडचा विकास आरखडा तयार करण्याच्या सुचना विभागीय वनअधिकारी चिपळूण यांना दिल्या. मंडणगड बसस्थानकाच्या आवारात सार्वजनीक स्वच्छतागृहाचे निर्मितीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करुन महामंडळाने येथे सार्वनिक स्वच्छतागृहाचे निर्मितीकरिता काम हाती घ्यावे व त्यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार निधीतून फंड उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सागरी महामार्गावरील बाणकोट बागमांडला पुलाचे काम सुरु झाले असून त्याकरिता आवश्यक असणार्‍या तांत्रीक बाबीची तयारी अंतीम टप्यात असल्याचे ते म्हणाले.

म्हाप्रळ - आंबेत या दोन गावांना जोडणारा जुना पूल होणार नवीन...

सावित्री नदीवर म्हाप्रळ - आंबेत या दोन गावांना जोडणारा जुना पूल जीर्ण झाल्याने नवीन पूल राज्य शासनाकडे प्रस्तावित केलेला असल्याचे तसेच नजीकच्या काळात होणार्‍या अधिवेशनात पुलाच्या कामाची घोषणा व त्याकरिता निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT