रत्नागिरीत ३ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.   File Photo
रत्नागिरी

रत्नागिरीत ३ विद्यार्थिनींचा विनयभंग; संस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल

Ratnagiri News | कोळंबे येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये ( वय ६८), त्याचा मुलगा प्रथमेश मुळ्ये आणि मुख्याध्यापक संजय मुळ्ये या तिघांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शहर पोलिस ठाण्यातून संगमेश्वर पोलिस ठाण्यात झिरो नंबरने पाठवण्यात आला आहे.

याबाबत संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा संगमेश्वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या तिन्ही मुली गणपती सुट्टी दरम्यान आपल्या गावी गेल्या नव्हत्या. त्यातील एक १७ वर्षीय पीडिता ही फिर्यादी असलेल्या ग्रंथपाल महिलेकडे सुट्टीत राहण्यासाठी गेली होती.

त्यानंतर फिर्यादी आपल्या गावी गेल्यानंतर पीडिता संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये यांच्या घरी राहण्यासाठी गेली होती. यावेळी संशयित नयन यांनी तिचा विनयभंग केला. तर त्याच्या मुलाने तिला धमकावले. याबाबत तिने मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पीडितेने घडलेला सर्व प्रकार फिर्यादी महिलेला सांगितला. अन्य दोन पीडितांचा विनयभंग कोठे करण्यात आला, याचा तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

मुलींच्या वसतीगृहाला मान्यता नाही

या संस्थेतील मुलांच्या वसतीगृहाला शासनाची परवानगी आहे. परंतु, मुलींच्या वसतीगृहाला परवानगी नसतानाही संशयितांनी अनधिकृतपणे मुलींचे वसतीगृह सुरु केले आहे. त्यात सध्या एकूण २३ मुलींचे वास्तव्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT